
अकोला : वेगवेगळ्या जाहिरातींच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या माथी बोगस बियाणे मारणाऱ्या दोन कंपन्यांचे बियाणे प्रयोगशाळेच्या अहवालात अप्रमाणित आढळले आहेत. सदर कंपन्यांचे तीन सोयाबीनचे बियाणे नमुने अप्रमाणित आढळल्याने कंपन्यांना नोटीस जारी करण्यात आली आहे. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा त्यासाठी सात तालुका स्तराव सात व जिल्हास्तरावर एक पथक सुद्धा कार्यान्वित करण्यात येते. सदर पथक कृषी निविष्ठा विक्रेता दुकानात जावून बियाणे, खत व किटकनाशकांचे नमुने घेते. सदर पथकाने या खरीप हंगामात घेतलेल्या बियाण्यांच्या नमुन्यांपैकी यापूर्वी सहा बड्या कंपन्यांच्या आठ बियाण्यांचे नमुने प्रयोगशाळेच्या अहवालात फेल आढळले होते. त्यानंतर आता बाळापूर तालुक्यात पुन्हा दोन कंपन्यांचे सोयाबीन बियाणे प्रयोगशाळेच्या अहवालात अप्रमाणित आढळले आहेत. त्यामुळे सदर कंपन्यांवर कृषी विभाग नोटीस जारी करेल. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. |
|||
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.